¡Sorpréndeme!

भीमसैनिक बेहाल पहा हा व्हिडिओ | चैत्यभूमीवर ओखी वादळामुळे आलेल्या पावसाचा जबर फटका

2021-09-13 0 Dailymotion

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवर आलेल्या लाखो भीमसैनिकांना मंगळवारी ओखी वादळामुळे आलेल्या पावसाचा जबर फटका बसला. भीमसैनिकांसाठी महापालिकेने शिवाजी पार्क मैदानात बांधलेल्या मंडपाला ताडपत्र्या नसल्याने आंबेडकरी अनुयायांना पावसात भिजावे लागले. पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांना पालिकेच्या शाळांमध्ये हलवण्यात आले. मात्र शाळेला आधी कळवले नसल्याने शाळेने आतमध्ये घेण्यास नकार दिल्याने गोंधळ उडाला. शिवाजी पार्क मैदानात पावसामुळे चिखलाचा राडा झाला होता. त्यातच रात्री आठच्या सुमारास मंडप कोसळून शॉट सर्किट झाले. या दुर्घटनेत तीन अनुयायी जखमी झाले असून त्याना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews